| उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये.. |
| असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये |
| नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार.. |
| सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये... |
| असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये |
| असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे.. |
| जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये... |
| असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये |
| शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार.. |
| असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये... |
| असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये |
| कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव.. |
| वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये... |
| असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये |
| कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ.. |
| तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये... |
| असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥ |
एक प्रयत्न आहे, की अपनास कविता, यस एम् यस, लेख, आणखी इतर बाबी एकाच ठिकाणी देने, यावर आपली प्रतिक्रिया, सूचना असतील तर कृपया द्यावे, त्याचे स्वागत असेल ...
हव ते शोधा
Custom Search
Wednesday, May 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment