पाहून राजे तुमच्या प्रतिमेकडे
मान आमची शरमेने झुकते
तुमच्या प्रतिमेकडे पहाताना सुद्धा
लाज आम्हाला वाटते ...
लाज आम्हाला वाटते कारण
आम्ही तुमचे मावले आहोत
निर्माण केलेले स्वराज्य तुम्ही
आम्हीच धुलिस मिलवत आहोत ..
लाज आम्हाला वाटते कारण,
तुमची आठवन फ़क्त जयंतिलाच होते
तुमचे एक ही गुण आत्मसात न करता
उत्साहात जयंती साजरी होते ...
लाज आम्हाला वाटते कारण,
तुमच्या किल्ल्यांची दुरावस्था आमच्या मुलेच होते आहे
रायगडावर फ़क्त सजावट
तुमच्या जयंतिलाच होते आहे ...
लाज आम्हाला वाटते कारण,
तुमची खरच गरज आहे
पण शिवाजी शेजारच्या घरी जन्मावा
ही या मावल्याची इच्छा आहे ..
~~ हेमंतकुमार
No comments:
Post a Comment