हव ते शोधा

Custom Search

Sunday, June 20, 2010

औदुम्बर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला अौदुंबर

कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

No comments: