हव ते शोधा

Custom Search

Friday, November 7, 2008

लेख

'राज' ची शिकवन काय ?

गेल्या काही महिन्या पासून महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हां वाद काही नवा नव्हे. भारतासारख्या देशामध्ये प्रांतवाद , भाषावाद हां नवा मुद्दा नाही परन्तु सुद्धा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील मराठीच्या भुमिकेवरुन आणि 'राज'च्या मृत्युनंतर सर्व अमराठी नेते मराठी विरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. नेहमीप्रमाने इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा मराठी विरुध उभा आहे. 'अमराठी' नेत्यानी केलेले विधाने या मीडियाला दिसत नाहीत परन्तु राज ठाकरे यानी केलेली विधाने दिसतात. 'मराठी लोकाना मारण्यासाठी मानसे आनु' हे विधान करणारे मीडिया ला दिसत नाहीत परन्तु 'मराठी माणसाला हात लावाल तर हात तोडू ' हे विधान करणारे राज ठाकरे त्यांच्या डोळ्यात खपतात. एरव्ही एकमेकांवर आग पाखड करणारे बिहारचे नीतिश आणि लालू या मुद्द्यावर एकत्र येउन विधाने करू लागली. मायावती यानी तर आग पाखडली, अनेक नेत्यानी एकत्र येउन मराठी विरुध मोर्चा उभारला तरीही मराठी नेत्यानी तोंडातून ब्र सुद्धा नाही काढला. हीच आश्चर्याची बाब आहे ?
'मराठी ' नेते हे नकार्ते आहेच असे समजायला हवे. महाराष्ट्राचा गृहमंत्री मराठी, राष्ट्रपति मराठी तरीही महाराष्ट्रातील रेलवे भरती चे परीक्षा केंद्रे काढून घेतले जाते ? रेलवे मध्ये भरती न होण्या इतके मराठी युवक नालायक आहेत काय? जाणून बुजुन मराठी युवकाना संधि दिली जात नाही आणि मराठी नेते शेपटी खाली टाकुन बसल्या शिवाय काही करत नाहित. या नाकर्ते पनामूले ही वेळ आली आहे.
'मराठी - अमराठी ' वादावर अमराठी भाषिक एकत्र येत आहेत. मेल, ब्लॉग, पेपर मद्यामातुन एकत्रीकरण करत आहेत. आता आपण विचार करायचा आहे, एकत्र यायचे की नाही? राज ठाकरे यांच्या मागे ताठ उभे रहायचे आहे की नाही?
(कृपया हां लेख म्हणजे राज ठाकरे यांचे समर्थन नाही )
-- हेमंतकुमार

2 comments:

सुजित बालवडकर said...

saheb tumacha blog aahe. tumhi kadhi mahanala nahit.

chaan aahe pan blog. keep it up.

Hemantkumar said...

Thank you vary much.. Aple suggestion det rahane.