| तू खरच समजदार आहेस हे सांगायचे आहे एकदा मला मागे जायचे आहे ....
एका मैत्रिणीला मी अवादायचो, पण ती मला आवडायची नाही |
| म्हणून मी तिला कधी जवळ येऊ दिले नाही |
| तू खरच सुन्दर आहे हे सांगायचे आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
शेजार चे काका नेहमी चांगले सांगत |
| काय वटवट करतात म्हणून त्याना मी टालत |
| काका , तुम्ही जे सांगायचे ते मला परत एकायचे आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
गैरसम्जुतिमुले कट्ट्यावर झालेले भंडन |
| त्यातून दूरवाले मित्र |
| सर्वाना मी भांडखोर नाही , हे सांगायचे आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
माझ्यासाठी अनंत कष्ट करणार्या बाबाना कधी सुख दिले नाही |
| माझ्यावर अभिमान व्ह्यावा असे काही केले नाही |
| बाबा , मला त्या चूका सुधारय्च्या आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
माझ्या साठी कळ सोस्नार्य आईला , जवळ घेउन कधी बसलो नाही |
| कुशीत तिच्या शिरून कधी रडलो नाही |
| आई , तू जगातली सर्वात सुन्दर आई आहे , हे सांगायचे आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
सोन्यासारखा लहाना भाऊ माझा , मोठा म्हणून अधिकार गज्वाय्चो |
| प्रेमाचे बोल कधी ना बोलायचो |
| मिठीत तुला घ्यायचे रे छोट्या , माझा ही तुझावर जीव आहे , हे सांगायचे आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
जगता धड्पद्ताना मी पुढे चालत राहिलो |
| सुटले ते मागे ते सोडत राहिलो |
| झालेल्या चूका मला सुधारय्च्या आहे |
| एकदा मला मागे जायचे आहे ....
~~ हेमंतकुमार |
|
|
|
|
|
|
|
1 comment:
I read this poem twice, nice poem -- Sudhir
Post a Comment