| आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे, |
| क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥ |
| किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग, |
| पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग. |
| कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे, |
| क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥ |
| जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती, |
| दिली दुर्दैवाला पाठ; अन् संकटाला छाती. |
| सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे, |
| क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥ |
| काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले, |
| बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले. |
| जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे, |
| क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥ |
| कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती, |
| जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती. |
| येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे, |
| क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥ |
| --- संदीप खरे. |
एक प्रयत्न आहे, की अपनास कविता, यस एम् यस, लेख, आणखी इतर बाबी एकाच ठिकाणी देने, यावर आपली प्रतिक्रिया, सूचना असतील तर कृपया द्यावे, त्याचे स्वागत असेल ...
हव ते शोधा
Custom Search
Wednesday, May 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment