| आठवतं तुला ? |
| आठवतं तुला त्या भेटीत |
| रिमझिम सरींनी छेडलं होतं . |
| भर दुपारी मला जणू |
| चांदण्याने वेढलं होतं . |
| आठवतं तुला त्या भेटीत |
| श्रावण धुंद बहरला होता . |
| ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने |
| ओला देह शहारला होता . |
| आठवतं तुला त्या भेटीत |
| दोघे व्याकुळ झालो होतो . |
| तुझा गंध वेचता वेचता |
| मीही बकुळ झालो होतो . |
| आठवतं तुला त्या भेटीत |
| भावनांनी कविता रचली होती . |
| माझ्या डोळ्यात तू अन |
| तुझ्या डोळ्यात मी वाचली होती. |
| आठवतं तुला त्या भेटीत |
| आणखी काय घडलं होतं ? |
| मला स्मरत नाही पुढचं |
| बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं . |
| - संदिप खरे |
एक प्रयत्न आहे, की अपनास कविता, यस एम् यस, लेख, आणखी इतर बाबी एकाच ठिकाणी देने, यावर आपली प्रतिक्रिया, सूचना असतील तर कृपया द्यावे, त्याचे स्वागत असेल ...
हव ते शोधा
Custom Search
Wednesday, May 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment