| हे गंधित वारे फिरणारे |
| घन झरझर उत्कट झरणारे . . . |
| हे परिचित सारे पूर्वीचे . . . |
| तरी आता त्याही पलिकडचे . . . |
| बघ मनात काही गजबजते . . . |
| क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे |
| उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . . |
| हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . . |
| कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे |
| सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे |
| हे गीत जयाला पंखसुध्दा . . . |
| अन हवाहवासा डंखसुध्दा . . . |
| कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . . |
| क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे |
| उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . . |
| हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . . |
| मनात जे जे दडून होते नकळत आकळते |
| कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते |
| ही जाणीव अवघी जरतारी . . . |
| हर श्वासातुन परिमळणारी . . . |
| हर गात्रातुन तगमगणारी . . . |
| क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे |
| उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . . |
| हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . . |
| नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले |
| बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले |
| हा स्पर्श विजेच्या तारांचा . . . |
| हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . . |
| हा जीव न उरला मोलाचा . . . |
| क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे |
| उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . . |
| हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . . |
| -संदिप खरे |
एक प्रयत्न आहे, की अपनास कविता, यस एम् यस, लेख, आणखी इतर बाबी एकाच ठिकाणी देने, यावर आपली प्रतिक्रिया, सूचना असतील तर कृपया द्यावे, त्याचे स्वागत असेल ...
हव ते शोधा
Custom Search
Wednesday, May 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment